येथे क्लिक करा →
पुणे शहरात निवडणुकीचे पडघम वाजायला लागले आहेत. गेल्या दोन निवडणुकीत आपण मला प्रभागाचे प्रतिनिधित्व करायला दिले, म्हणून माझ्या प्रचाराचा श्री गणेशा, हा माझ्या लोकांशी थेट पत्र लिहून करावा असे मला वाटले म्हणून हा पत्र प्रपंच.
आपलं पुणे शहर म्हणजे महाराष्ट्राच्या मुकुटातील कोहिनूर हिरा, माँ साहेब जिजाऊनी सोन्याचा नांगर फिरवून, या इथल्या मातीचे नशीबच बदलून टाकलं... क्रांतीज्योती सावित्रीबाई फुल्यांनी इथ शाळा काढली आणि या शहराला विद्येच्या माहेरघराची बिरूदावली लाभली.
झपाट्याने बदलणारे आपले पुणे शहर सायकलीवरून मेट्रो पर्यंत आले. सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक सर्वच बाबतीत या शहराला पुढे आणण्यात अनेकांचा महत्वाचा वाटा आहे. असेच एक नाव म्हणजे, पुण्याचे चिनविरोध माजी महापौर स्व. भारत (आबा) सावंत होय.
लोकप्रतिनिधी म्हणून काम कसे करावे याचा वास्तूपाठ म्हणजे आबा... आबांनी नगरसेवक म्हणून काम करताना फुले नगर, विश्रांत वाडी, नागपूर चाळ या भागांना पुण्याच्या केंद्र स्थानी आणले. आबांचा हाच वारसा त्यांची सून म्हणून मला लाभला हे मी माझे अहो भाग्य समजते.
तसा आम्हा संपूर्ण सावंत कुटुंबाला, आपल्या सर्वांचे प्रेम कायम भरभरून मिळाले. म्हणूनच आपल्यासारख्या माय बाप जनतेने त्यांची बहीण म्हणून, कधी वाहिनी म्हणून, तर कधी सून म्हणून मला दोन वेळा मताधिक्क्याने नगरसेविका म्हणून महापालिकेत पाठविले. जनतेने दाखविलेला हा विश्वास जपणे हे मी माझे परम कर्तव्य समजते.
या दोन टर्म मधे पालिकेची पायरी चढताना मला सतत हेच जाणवायचे, की ज्यांनी मला इथे पोचविले आहे त्यांच्या साठी मी काय काय सुविधा आणू शकेन आणि माझे हे प्रयत्न यशस्वी देखील झाले.
नगरसेवक म्हणून निधी आणणे आणि त्यामधून जाहीरनाम्यात दिलेली वचने पूर्ण करणे, हा आबांचा वस्तुपाठ मला मार्गदर्शक होता. म्हणूनच, आपल्या भागात भरपूर प्रमाणात विकास कामे पूर्ण झाली.
नागरिकांच्या गरजा ओळखून पाणीपुरवठा, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था आणि सार्वजनिक सुविधांवर लक्ष देत अनेक महत्त्वाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
पुणे मनपा २४ * ७ पाणीपुरवठा योजने अंतर्गत पाईपलाईन ची कामे
नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी जागतिक दर्जाचे स्व. महापौर भारत सावंत पाम उद्यान,
नागपूर चाळ भागात नवीन पथदिवे बसवून परिसर अधिक सुरक्षित व प्रकाशमान केला.
परिसरातील स्वच्छता आणि सोयीसाठी ड्रेनेज लाईनचे काम वेगाने पूर्ण करून नागरिकांना दिलासा.
नागरिकांच्या सोयीसाठी महत्त्वाच्या ठिकाणी बेंचेस बसवून विश्रांतीची सुविधा उपलब्ध करून दिली.
टिंगरेनगर परिसरात काँक्रीट रोडचे काम करून नागरिकांना सुरक्षित, टिकाऊ आणि आरामदायी रस्त्यांची सुविधा.
परिसरात भूमिगत विद्युत लाईनचे काम करून सुरक्षित, स्थिर आणि अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित केला.